दूर होतो. प्रत्येक आजाराचे मूळ पोटात असते. तसे पोटाचे आजार बद्धकोष्ठाने सुरु होतात. सध्याच्या काळात शंभरातून ९० व्यक्ती बद्धकोष्ठाने त्रस्त आहे. बद्धकोष्ठ अनेक रोगांचे मूळ आहे. बद्धकोष्ठाचा इलाज झाला तर इतर अनेक रोग चुटकीसरशी नाहीसे होतात, बद्धकोष्ठाच्या रुग्णांनी सर्वप्रथम दिवसभरात तीन ते चार लिटर पाणी प्यावे, पाणी कमी पिणे आणि जेवणात द्रव, पातळ पदार्थाचा अभाव ही बद्रकोष्ठाची प्रमुख कारणे आहेत. म्हणून आपल्या दिनपर्यंत प्रत्येकाने भरपूर पाणी आणि फळांचा रस यांचे सेवन जरूर करावे. येथे आवश्यक गोष्ट सांगायची म्हणजे जेवण करताना पाणी पिण्याऐवजी जेवण केल्यानंतर एक तासाने पाणी प्यावे. बद्धकोष्ठ दूर करण्याचे काही उपाय पुढे दिले आहेत. 4) दोन चिमूट ओवा-पावडर मचात घालून घोटघोट प्यायल्याने दोनतीन दिवसांत बद्धकोष्ठ दूर होतो. २) सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी दोन सफरचंद खाल्ल्यास ब्दकोष्ट नष्ट होईल. ३) रात्री झोपण्याआधी एक ग्लास पाण्यात एक चमचा मध घालून प्यायल्याने बद्धकोष्ठ नाहीसा होईल. ४) सकाळी अनशापोटी पाच ग्रॅम मनुके खाल्यास ब्दकोष्ठ दूर होईल. ५) दोन मोठया पिवळ्या संत्र्यांचा रस सकाळी नाश्ता करण्यापूर्वी प्यादा. आठवड्याभरातब्दकोष्ठ दूर होईल. ६) हरदा तुपात भाजून घ्यावा. त्यात तेवव्याप्रमाणात काळे मीठ घालून बाटावा. हे चूर्ण रात्री झोपताना कोमट पाण्यात घालून ते एक लहान चमचा प्यावे. ७) बीटची पाने टोमॅटो किंवा सॅलडबरोबर खाल्ल्याने बद्धकोष्ठ नष्ट ८) चाळण न केलेल्या पिठाची भाकरी खाल्ल्यास बद्धकोष्ठ दूर होतो. २) त्रिफळा २० ग्रंम रात्री कपभर पाप्प्यात भिजवून ठेवा. सकाळी शौचाला जाण्यापूर्वी त्रिफळा काढून टाकून ते पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठ १०) सात-आठ अंजीर पाण्यात उकळून काढा तयार करावा, रात्री झोपताना हा काढा प्यावा. हा कादा तीनचार दिवस प्यायल्याने बद्धकोष्ठ दूर होईल. यावेळी जुलाब होऊ लागल्यास काढा पिणे बंद करावे. ११) गाजर, मुळा, बीट, कोबी, टोमॅटो, पालकाची पाने, पवळी यांचे सॅलड तयार करुन त्यात खोबऱ्याचे तुकडे घालावेत. ते जेवणाबरोबर अगर जेवणानंतर खावे. बद्धकोष्ठ दूर होईल. १२) अनशापोटी एक ग्लास पाण्यात एका लिंबाचा रस व सैंधव मीठ एक गेम टाकून काही दिवस प्याये, यामुळे जुना बद्धकोष्ही नाहीसा होतो. १३) झोपण्याआधी कोमट पाण्याबरोबर तीन गेम बडीशेपचे चूर्ण धेने बदकाक्षात फायदेशीर ठरते. सूचना-वरील मजकुरात सुचविलेले उपाय जाणकाराच्या सल्ल्याने करावेत.