डॉ. मेतन फाउंडेशनच्यावतीने १५ वंचित महिलाना १५ दिवसांचे रेशन वाटप

सोलापूर (प्रतिनिधी) : येथील डॉ. व्यंकटश मेतन यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. मेतन फाउंडेशनच्या माध्यमातून मंगळवार दि. ३१ मार्च रोजी निरामय आरोग्यधाम - महाराष्ट्र एझ नियंत्रण टी. आय. प्रकल्प सोलापूर संस्थेच्या जुना घरकुल कार्यालय येथे तेथील १५ वंचित महिलांना १५ दिवसांचे राशन (शिवा) मोफत देण्यात आले. यामप्ये प्रत्येकी २ किलो तूरडाळ, १ किलो हरभरा, १ किलो साखर, १ किलो गोडतेल, १ किलो मीठ, २५० ग्रॅम तिखट, २५० ग्रॅम हळद, २ डेटॉल साबण, १ किलो बटाटे, १ किलो कांदा यांचा समावेश होता. हे कार्य करीत असताना सध्याची गंभीर परिस्थिती पाहता सरकारने सांगितलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करन सर्व काळजी घेण्यात आली होती. यावेळी डॉ. मेतन फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येकाला मास्क वाटण्यात आले. हा उपक्रम राबविण्यासाठी श्री. महेश बनसोडे, श्री. सिद्धाराम सकरगी आणि श्री. चिदानंद मुस्तारे यांनी कठीण परिश्रम घेतले तसेच डॉ. सीमा किणीकर आणि श्री. सतीश राठोड यांचे हा प्रकल्प आयोजनासाठी सहकार्य मिळाले.